Communication is the key!

कुठल्याही नात्यामध्ये संवाद खूप महत्वाचा असतो. त्यात ते नाते पती पत्नीमधील असेल तर संवाद हा त्या नात्याचा पाया असतो.  जर एकमेकांसोबत संवाद नसेल तर ते नात एखाद्या सुकलेल्या झाडासारखे असते. आतून पोकळ, पण बाहेरून दिसायला मात्र अखंड… Continue reading

कल्लोळ

नुकतेच काही महिन्यापूर्वी बहिणीचे आणि भावाचे लग्न झाले. आईच्या दृष्टीने तिच्या जबाबदाऱ्या पुर्ण झाल्या. अर्थात मलाही असंच वाटत. आईने जन्म दिला, वाढवले, चांगले संस्कार दिले, लग्न लावून दिले कि बास!! तिची जबाबदारी पुर्ण झाली. नंतर आई बाबांचे स्थान हे दीपगृहाचे; मुले भरकटत आहेस असे वाटले तर रस्ता दाखवायचे.  Continue reading

कारणं

दृश्य १

तो  : अग माझे कपडे washing machine ला लावायचे आहेत. उद्या परवापासून मला ऑफिसला घालायला नाहीत.

ती : जरा लावा नं!

तो सगळे कपडे एकत्र लावतो machine ला.

ती : अरे! काही कपड्यांचा रंग जातो, ते वेगळे ठेवायचे असतात, काही हाताने धुवायचे आहेत, ते हि वेगळे ठेवायचे असतात.

तो : मी काही केलेलं तुला पटत नाही. म्हणूनच मी काही करत नाही. Continue reading

थोडा वेगळा दृष्टीकोन समानतेबाबत

दोघेही संध्याकाळी थकून दमून घरी येतात…

तो – हात पाय धुतो, खुर्चीत बसतो, TV लावतो.       ती – हात पाय धुते, स्वयंपाक घरात जाते, चहा ठेवते.

तो – अग जरा येताना मला पाणी आणशील?           ती – स्वतःचा चहा आणि त्याचे पाणी आणते.

Continue reading